
स्नेहसंमेलनाने पुन्हा जागल्या जुन्या आठवणी; रवींद्र हायस्कूलच्या ८८-८९ बॅचचा भावनिक मिलाफ भूममध्ये दिमाखात पार पडला!
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
नवनाथ यादव
धाराशिव/भूम (प्रतिनिधी) – रवींद्र हायस्कूल, भूम येथील १९८८-८९ च्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रविवारी (२७ जुलै) संत श्री गजानन महाराज मंदिर सभागृहात अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडले. या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देत सहपाठींनी दिलखुलास गप्पा मारल्या तर शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ९ वाजता शाळा भेट व अल्पोपहाराने सुरू झाले. सकाळी १० ते १ या वेळेत स्वागत समारंभ, दुपारी १ ते २ भोजन, नंतर एकमेकांचा परिचय, गप्पा आणि मनोरंजनाचा कार्यक्रम, तसेच ४ ते ५ दरम्यान आभार, फोटोसेशन आणि निरोप असा भरगच्च कार्यक्रम पार पडला.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली आणि पुन्हा त्या वस्तीतील गोड क्षण अनुभवले. यावेळी त्याकाळच्या मुलींची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. कार्यक्रमात तत्कालीन शिक्षक सुभाष साठे, मोहन सलगर, श्रीधर वाघमारे, एन. आर. वारे, नामदेव शेंडगे, भाऊसाहेब जगदाळे, श्री. होनराव, श्री. कवाळे, श्री. उगलमुगले यांचा विद्यार्थ्यांनी मानचिन्ह देऊन सन्मान केला.
कार्यक्रमाला भूम नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, डॉ. विजयकुमार सूळ, पत्रकार सुनीलकुमार डुंगरवाल, बाळासाहेब निकाळजे, महादेव मनगिरे, जयेंद्र मैदर्गे, सोमनाथ पुरी, प्रदीप निकाळजे, नवनाथ सोनवणे, हरी कदम, राजाराम कदम, रवींद्र सम्राट, मोहन घोरपडे, संजय जगदाळे, महेश तांबोळकर, संदीप माने, धैर्यशील जाधव, प्रदीप नाईकवाडी, विक्रम बनसोडे, सुरेश बागल, विजय मनसुके, अरुण सोनटक्के, रेवण वारे, मोहन गाडे, विनोद कुलकर्णी, विजय रेपाळ, प्रभाकर शेळके, सुदाम गुंजाळ, बालाजी शिर्के, चंद्रकांत गाढवे, किशोर वेदपाठक, गजेंद्र चौधरी, संजय बनसोडे, बाळासाहेब कदम, राजेंद्र शेळके, पवन विधाते, अमीनुल्ला पठाण, धन्यकुमार लोखंडे, अशोक साबळे, कमलाकर मुसांडे, श्रीकांत राऊत, दत्ता गवळी, गणेश लांडे, मोहन पाटुळे, सुखदेव शेळके, श्रीमंती छाया अंधारे, सुनीता कराळे, मनीषा मराठे, अर्चना भिंगारे, बेबी विधाते यांच्यासह अनेक सहपाठी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी पुन्हा भेटीचा निर्धार करत जुन्या आठवणींना हृदयात साठवत निरोप घेतला.