
कोथरूड पोलिसांवर मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केल्या प्रकरणात संबंधित मुलींच्या ससूनच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आला असून त्यामध्ये कोणतेही त्यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुलींना कुठलीही छोटी अथवा मोठी गंभीर इजा नसल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित मुलीच्या मारहाणीच्या आरोपात तथ्य नसल्याचे उघड झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २३ वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं गेलं. तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला आहे.
पोलिसांनी आरोप फेटाळले
मुलींचे हे आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. प्रथमदर्शनी घडलेली घटना/घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारीत नसून प्रथमदर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्याय संहीता/अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ अंतर्गत दखलपात्र गुन्हा होत नसल्याचे दिसून येत आहे.
ती घटना एका खोलीत घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. मुलींनी जी अॅट्रोसिटीची तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य आढललेले नाही. त्यामुळे याप्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी मुलींना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.