
हिमनदी वितळताच हादरले कुटुंब; समोर आले ते सत्य…
कुटुंबातील एखादी व्यक्ती अचानक घर सोडून गेली अथवा अचानक संकटात सापडून गायब झाली तर त्यांची अवस्था वाईट होते. जून 1997 मध्ये एका हिम वादळात पाकिस्तानमधील तरूण बेपत्ता झाला. 28 वर्षांपासून त्याचे कुटुंबीय त्याची वाट पाहत होते.
त्याला शोधण्यासाठी त्यांजी जंग जंग पछाडले. अखेर त्याची माहिती मिळाली, पण कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. हिमनदी वितळल्यानंतर या तरुणाचा मृतदेह सापडला. बर्फात राहिल्यामुळे त्याचे शरीर गळाले नाही. त्याच्या शरीरावरील कपडे सुद्धा फाटलेले वा जीर्ण झालेले नाही. हिम वादळात तो हिमनदीत गाडला गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
गुराख्यांना सापडला मृतदेह
पाकिस्तानातील कोहिस्तान बागात लेडी व्हॅली आहे. येथे आता बर्फ वितळण्यास सुरूवात झाली आहे. बर्फ वितळल्याने अनेक बर्फाच्छादित भाग मोकळा झाला आहे. तिथे गुराख्यांना एका तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी लागलीच पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांना या तरुणाच्या खिशात एक ओळखपत्र मिळाले. त्याआधारे तो नसीरुद्दीन असल्याची माहिती समोर आली. पुढे तपासात तो 28 वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्याचे पोलिसांना कळले. जून 1997 मध्ये या भागात एक हिम वादळ आले होते. त्यापासून वाचण्यासाठी नसीरुद्दीन आश्रय शोधत असतानाच तो नदीच्या एका फटीत अडकला आणि त्यातच त्याचा मृत्यू ओढावला. हा भाग पुढे कित्येक वर्षे बर्फाच्छदित होता. तिथे नसीरुद्दीन चिरनीद्रेत होता. बर्फात राहिल्याने त्याचे शरीर खराब झाले नाही. त्याचे कपडे पण सुस्थितीत आढळले.
मुलं झाली मोठी
उमर खान या गुराख्याने सांगितले की, मृतदेह शाबूत होता. शरीर कुठेच खराब झालेले नव्हते. त्याचे कपडे ही सुरक्षित होते. बीबीसीला त्याने ही माहिती दिली. पोलिसांना त्याच्या खिशातून ओळखपत्र मिळाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीरुद्दीन याला दोन मुलं आहेत. 28 वर्षांपूर्वीच त्यांच्या डोक्यावरील वडीलांचे छत्र हिरावल्या गेले. आता मुलं मोठी झाली. त्यांना या घटनेने धक्का बसला.
भावाने सांगितला त्या दिवशीचा घटनाक्रम
नसीरुद्दीन याचा भाऊ कथिरुद्दीन याने त्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला. जून 1997 मध्ये ते दोघे या खोऱ्यात पोहचले. दुपारपर्यंत त्यांनी फेरफटका मारला. मग कथिरुद्दीन हा जवळच्याच एका गुफेत गेला. परत आल्यावर त्याला भाऊ दिसला नाही. त्यावेळी हिम वादळ येऊन गेले होते. त्याने ही गोष्ट घरी सांगितली. स्थानिकांनी त्यावेळी शोध घेतला. पण नसीरुद्दीन दिसला नाही. पुढे तो परत येईल या आशेवर त्यांनी कित्येक वर्षे काढली.