
असीम मुनीर यांची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी
सिंधू जल कराराचा मुद्दाही पुन्हा उपस्थित भारत-अमेरिका तणाववरही असीम मुनीर यांची प्रतिक्रिया
इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते.
यावेळी मुनीरने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे. त्यांनी भारतावर अणु हल्ल्या करण्याचे पुन्हा एकदा पुनरुच्चारण केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला आहे, मात्र तरीही येथील अधिकाऱ्यांची गुर्मी मात्र उतरलेली नाही.
द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा हात पाठिवर पडताच स्वत:ला उच्च समजले आहे. त्यांनी अमेरिकेतून भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली आहे. जर भारताने भविष्यात पाकिस्तानवर हल्ला करण्याच प्रयत्न केला तर आम्ही निम्मं जग उद्धवस्त करुन टाकू असे मुनीरने म्हटले आहे.
असीम मुनीर यांची धमकी
टैम्पामधील पाकिस्तान मानद वाणिज्य दूत अदनान असद यांच्यासाठी एक ब्लॅक-टाई जिनरचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी असीम मुनीर यांना देखील आमंत्रण मिळाले होते. यावेळी असीम मुनीर टैम्पामध्ये या डिनरसाठी सहभागी झाले होते. यावेळी मुनीरने पुन्हा एकदा अणु हल्ल्याचा राग आपला.
असीम मुनीरने म्हटले की, पाकिस्तान एक अण्वस्त्र संपन्न देश आहे, जर पाकिस्तानला कोणापासून धोक्याची जाणीव झाली तर, अर्ध्या देशाला घेऊन पाकिस्तान बुडेल.
सिंधू नदीचा मुद्दाही पुन्हा उपस्थित
ब्लॅक टाई डीनरदरम्यान मुनीर यांनी सिंधू जल कराराचाही मुद्या पुन्हा उपस्थित केला. मुनीर यांनी भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे त्यांच्या देशातील लोकांना उपासमारीचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले. मुनीर यांनी पाकिस्तानकडे मिसाइल्सची कमरता नसून अर्धे जग उद्धवस्त करु टाकण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे.
भारताने पहलगाम हल्ल्यानंतप प्रत्युत्तरात्मक कारवाई म्हणून काही निर्णय घेतले होते. यातील एक निर्णय म्हणजे सिंधू जल करार स्थगित करण्यात आला होता. या नदीवर धरण बांधून पाकिस्तानचे पाणी रोखण्यात आले आहे.
भारत-अमेरिका तणाववरही बरळे मुनीर
द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, असीम मुनीर यांनी भारत आणि अमेरिका तणाववरही भाष्य केले आहे. मुनीर यांनी म्हटले की, भारताच्या पुर्वेला प्रचंड मूल्यवान खजिना आहे, पण आम्ही त्यांच्यासारखे कंजूस नाही. हे पाकिस्तानच्या यशाचं मुख्य कारण असल्याचे मुनीर यांनी म्हटले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केल्याचेही त्यांनी म्हटले.