
व्हाईट हाऊची भारताला उघड धमकी…
दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अलस्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि राशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये एक बैठक झाली, या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली, या बैठकीकडे भारताचं लक्ष लागलं होतं.
या बैठकीनंतर ट्रम्प भारतावर लावलेला टॅरिफ कमी करू शकतात असा अंदाज होता. मात्र आता तसं होताना दिसत नाहीये. अमेरिकेकडून रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भारताला धमकी देण्यात आली आहे.
पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वात जवळच्या व्यक्तीनं भारताला धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू मानले जाणारे आणि व्हाइट हाउसचे ट्रेड सल्लागार पीटर नवारो यांनी तेल खरेदीच्या मुद्द्यावर भारताला पुन्हा धमकी दिली आहे.भारत ज्या पद्धतीनं रशियाकडून तेल खरेदी करत आहे, ते पाहाता त्यांना लवकरच रशियाकडून तेल खरेदी बंद करावी लागेल असं पीटर नवारो यांनी म्हटलं आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करत आहे, आणि त्या पैशांमधून रशियाला युक्रेनविरोधात लढण्यासाठी मदत मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करावीच लागेल असं व्हाईट हाऊसने म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आधीच स्पष्ट केलं आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्याला अयोग्य प्रकार टार्गेट केलं जात आहे. कारण खुद्द अमेरिका आणि यूरोपीय यूनियन रशियाकडून वस्तुंची खरेदी करते, त्यांनी हा व्यापार सुरूच ठेवला आहे. दरम्यान भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावलं आहे. त्यामुळे येत्या 28 ऑगस्ट पासून भारतीयवस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे.
दरम्यान अमेरिकेनं जरी भारतावर टॅरिफ लावला असला तरी देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. आमच्यासाठी आमच्या देशाचं हीत सर्वात आधी आहे, अशी भूमिका यावर भारतानं आधीच स्पष्ट केली होती, पण भारताचा हा निर्णय अमेरिकेच्या काही पचनी पडण्याचं दिसत नाहीये, अमेरिकेकडून पुन्हा भारताला धमकी देण्यात आली आहे.