
भारत टॅरिफच्या मुद्द्यावरून चिंतेत असतानाच आता एक अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. ज्याला अनेक वर्षांपासून भारत शत्रू मानत तोच चीन आज भारताच्या मदतीला धावून आला आहे. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर भारत पर्यायी मार्ग शोधताना दिसतोय.
त्यामध्येच आता चीनने दुर्मिळ खनिजे, खत आणि बोरिंग मशीनच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे आणि ही भारतासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. दुर्मिळ खनिजे, खते आणि टनेल बोरिंग मशीनवरील निर्यात निर्बंध उठवली असून पुन्हा निर्यात सुरू केली आहे.
इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. दोघांच्या बैठकीमध्ये दुर्मिळ खनिजे, खते आणि टनेल बोरिंग मशीनबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतर चीनने जगभरातील दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा पुरवठा थांबवला होता. मात्र, आता भारतासाठी हे निर्बंध हटवण्यात आली.
चीनकडून जगभरात अमेरिकेच्या निर्णयानंतर निर्बंध लावण्यात आली होती. दुर्लभ मृदा चुंबक आणि खनिजांवर चीनने घातलेल्या निर्बंधांबद्दल ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. कारण त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने करणे शक्य नसल्याचे चिंता वाढली होती. शेवटी चीन हा भारताच्या मदतीला धावून आला आणि फक्त भारतासाठी सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. हा एकप्रकारे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला मोठा धक्का म्हणावा लागणार आहे.
चीनमध्ये दुर्मिळ मृदा चुंबक 65 टक्के आहे. याचे पूर्ण नियंत्रण हे फक्त चीनकडेच आहे. जगभरात चीन याची निर्यात करतो. चीनने निर्यात बंद केल्याने मोठा फटका हा इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांना बसला होता. शेवटी आता निर्बंध भारतासाठी हटवण्यात आली आहेत. भारताला चीनकडून दिलेला हा मोठा दिलासा आहे. आता यावर डोनाल्ड ट्रम्प हे नक्की काय भाष्य करतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादल्यानंतर चीनने पूर्णपणे या खनिजांची निर्यात बंद केली होती.