दैनिक चालु वार्ता इगतपुरी प्रतिनिधी :- श्री.विकास पुणेकर
इगतपुरी :- इगतपुरी नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी नगरपरिषदेची प्रभाग रचना सोमवारी (दि. १८) जाहीर करण्यात आली. मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या वतीने ही रचना प्रसिद्ध करण्यात आली. नव्या प्रभागरचनेत १ प्रभाग व तीन नगरसेवकांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण १० प्रभागांतून २१ नगरसेवक निवडले जाणार आहेत
मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नऊ प्रभाग होते व १८ उमेदवार संख्या होती. मात्र यंदा १० प्रभाग व २१ सदस्य असणार आहे. यंदा तीन उमेदवार वाढ झाली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये एक प्रभाग वाढल्याने तीन उमेदवारांना संधी प्राप्त झाली आहे. तर २१ उमेदवारांपैकी ११ महिला उमेदवारांना संधी प्राप्त झाली आहे. इगतपुरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक सहा सर्वात मोठा ४७३० लोकसंख्येचा प्रभाग असून यामध्ये तीन सदस्य असणार आहे तर सर्वात छोटा आठ प्रभाग असून याची लोकसंख्या २६५५ इतकी आहे. सण २०१७ च्या निवडणुकीनंतर थेट मुदत संपल्यानंतर तीन वर्षानंतर प्रशासक काळ असल्याकारणाने यंदा निवडणूक होणार आहे.
यामध्ये प्रभाग क्रमांक ६ वगळता अन्य प्रभागामध्ये दोन उमेदवार अशी रचना तयार करण्यात आली आहे.