
दैनिक चालु वार्ता इगतपुरी प्रतिनिधी :- श्री.विकास पुणेकर
इगतपुरी :- ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशन मुंबई मंडळाच्या वतीने व काॅ.वेणु पी नायर महामंत्री ( NRMU CR / KR ) यांचे आदेशा नुसार इगतपुरी एन आर एम यु ऑफीस येथे सेवानिवृत्त कामगारांच्या समस्या बाबत दिनांक 23/08/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता बैठक झाली त्या संदर्भात कमीत कमी 30/40 सेवानिवृत्त कामगार उपस्थित होते.
मीटिंग मघ्ये काॅ.जे.एन.पाटील मुंबई मंडळ अध्यक्ष AIRPWF, काॅ.अरुण मनोरे मुंबई मंडळ कार्यकारी अध्यक्ष AIRPWF, काॅ नारायण सोनावने मुंबई मंडळ उपाध्यक्ष AIRPWF, काॅ.वसंत कासार ऑर्गनाइजेन सेक्रेटरी AIRPWF, काॅ अहमद खान स.महामंत्री RTMU, सर्व मान्यवरांनी उपस्थित समुदायास मार्गदर्शन केले.सोबत कल्याण -कसारा शाखाचे अध्यक्ष काॅ प्रल्हाद खंदारे,काॅ दिलीप शिंदे उपाध्यक्ष कल्याण कसारा शाखा यांचे मोलाचे योगदान मिळाले,काॅ आनंदा धोंडीबा भालेराव मुंबई मंडळ सचिव AIRPWF, सर्वाचे आभार मानुन मिटिंग समाप्त केली.
काॅ वेणु पी नायर जीको लाल सलाम, एन आर एम यु जिंदाबाद, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद अश्या घोषणा देत जयजयकार केला.