
दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा – म्हसळा शहरांतील बहुजनांच्या वाहतुकीवर प्रशासन नाराज असताना आता बहुजनांच्या सोयीसाठी आसणाऱ्या एस . टी .पीकप ने – स्टँडवर सुद्धा खाजगी प्रवासी वाहाने आणि फेरीवाल्यानी विळखा घातला आसल्याची तक्रार श्रीवर्धन डेपो मॅनेजर म.अ.मणेर यानी म्हसळा तालुक्याचे तहसीलदार सचिन खाडे, नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठलराव राठोड,स.पो.नि.संदिप कहाळे यांच्याकडे केली आहे. पादचाऱ्याना शहरांतून चालण्यासाठी आणि फूटपाथ वरील खरेदी सहज,विनासायास करता यावी यासाठी नगरपंचायत, महसूल, पोलीस प्रशासनाने यावेळी विशेष काळजी घेऊन म्हसळा बाजारपेठे मधून एस. टी. वाहतुक न होण्यासाठी विशेप काळजी घेतली आहे. शहरांतील संपूर्ण वाहतुक ग्राहकांच्या सोयी साठी शहराच्या बाहेरून वळाविल्यामुळे प्रवाशाना एस. टी स्टँडवर येण्यासाठी रोज किमान रु११ ते रु१५ रुपयांचा बुर्दंड मोजून वेळेचा सुद्धा अपव्यय होतो.