
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी -बापू बोराटे
पुणे (इंदापूर):-इंदापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये अल्प कालावधीमध्ये लोकप्रिय झालेले जनता एक्सप्रेस मराठी न्यूज या चॅनलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल चे संपादक श्रीयश नलवडे व त्यांच्या सर्व टीमच्या वतीने इंदापूर तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा आदर्श पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, सहकारी साखर कारखाना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साह मध्ये संपन्न झाला.
जनता एक्सप्रेस मराठी न्यूज या चॅनल च्या वतीने आदर्श हॉटेल व्यवसाय म्हणून पुणे-सोलापूर रोडवरील इंदापूर येथील हॉटेल देशपांडे व्हेज यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार घेण्यासाठी हॉटेलचे मालक उदय देशपांडे,किरण गानबोटे व त्यांचे सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इतरही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श १६ व्यक्तिमत्त्वांचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
देशपांडे व्हेज यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर आज देशपांडे व्हेज यांच्या वतीने हा आनंदाचा क्षण सगळ्यांनी एकत्र साजरा करण्यासाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल चे संपादक श्रीयश नलवडे व त्यांच्या टीमचा सन्मान देशपांडे व्हेज चे सर्वेसर्वा उदय देशपांडे, किरण गानबोटे, दत्तात्रय देशपांडे, नाना देशपांडे,अपर्णा देशपांडे, राणीताई कोकाटे व सर्व सत्कारमूर्तींच्या वतीने करण्यात आला. इतरही सर्व सत्कार मूर्तींचा सन्मान यावेळी देशपांडे व्हेज परिवाराच्या वतीने करण्यात आला व सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.