
चिनमध्ये सध्या सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले.
यादम्यान पाकिस्तानचे फील्ड मार्शल सय्यद असीम मुनीर हे सोमवारी तियानजिन येथे दाखल झाले आहेत. सीएनएन-न्यूज१८ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर हे देखील रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भेटण्याची शक्यता आहे.
शाहबाज शरीफ यांनी या शिखर परिषदेदरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रैसी यींची भेट घेतली, यावेळी मुनीर हे देखील त्यांच्याबरोबर होते. तसेच चिनी अधिकाऱ्यांबरोबर होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेत देखील ते शरीफ यांच्या बरोबरीने सहभागी होतील.
तसेच बीजिंग आणि इस्लामाबाद यांच्यात वाढत असलेले लष्करी संबंध लक्षात घेता, मुनीर हे ३ सप्टेंबर रोजी चीनच्या लष्करी परेड डेला देखील हजर राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सोमवारी चीनमधील तियानजिन येथे सुरू असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. यावेळी मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. तसेच या जगतिक नेत्यांमध्ये वेगवेळ्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा देखील झाली.दरम्यान या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेचे व्हायरल झाले असून त्यांनी जगभरातील देशांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापाराच्या मुद्द्यावर तणाव असताना ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
शरीफ यांच्याकडे नेत्यांचे दुर्लक्ष
तियानजिन येथील परिषदेदरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये पुतिन आणि मोदी हे अनौपचारिक गप्पा मारत चालत असल्याचे दिसत आहे तर यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ हे मात्र एकटेच उदास चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहाताना दिसून येत आहेत.