
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला.
बळीराजाचा हातातोंडाशी आलेला हात पावसाने हिरावून घेतला. हजारो हेक्टर जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान राज्य सरकारने २२०० कोटींची तातडीची मदत जाहीर केली होती. आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत ही मदत जाहीर केली.
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बुजलेल्या विहींरींसाठी ३० हजार रुपये दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे पिकांवर मुलाप्रमाणे प्रेम असते. शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ४५ लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवला आहे. दिवाळीआधी मदत देण्याचा प्रयत्न असणार आहे. अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येणार आहे. २९ जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे उभारली जाणार आहेत. बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० रुपये प्रती हेक्टरी मदत केली जाणार आहे.
पॅकेजमध्ये नेमके काय?
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीमध्ये वाहून गेली आहे त्यांना ३.४७ लाख रुपयांची मदत हेक्टरी केले जाणार आहे. जमीन खरडून गेलेय शेतकऱ्यांना ४७ हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी ३ लाख नरेगाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
जनावरांना ३७ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. गाळ भरलेल्या विहिरींसाठी ३० हजार रुपये देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी केली अजणार आहे. ज्या शेतकऱ्यांची घरांचे नुकसान झाले आहे, त्यांची घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत उभी केली जाणार आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांना ३५ हजारांची मदत केली जाणार आहे. बागायती शेतीमध्ये ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना ५० हजरांपेक्षा जास्त मदत मिळणार आहे. विम्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना १७ हजार रुपये हेक्टरी मदत केली जाणार आहे.