
रामदेव बाबांनी सांगितला सर्वात सोपा उपाय !
योगगुरू रामदेव बाबा यांनी जगभरात योगाचा प्रसार केला आहे. त्यांच्या पतंजली कंपनीची आयुर्वेदिक औषधे अनेक आजारांवर प्रवाभी ठरत आहेत. रामदेव बाबा केवळ निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योगाचा प्रसार करत नाहीत, तर औषधे टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचाराच्या टिप्स देखील देत आहे.
सध्याच्या काळात बद्धकोष्ठता ही अनेक लोकांसाठी मोठी समस्या बनली आहे. रामदेव बाबा यांनी यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही सोपे उपाय सुचवले आहेत. याची माहिती जाणून घेऊयात.
बद्धकोष्ठतेता त्रास असणाऱ्यांचे पोट साफ होत नाही. याचे कारण म्हणजे पचनसंस्थेत मल जमा होतो आणि तो कठोर बनतो, परिणामी आतड्यांची हालचाल रोखली जाते व पोट साफ होत नाही. फायबरचे कमी सेवन कमी असणे, पुरेसे पाणी न पिणे किंवा औषधांचे सेवन मोठ्या प्रमाणात करणे यामुळे ही समस्या उद्भवू शकते. यावरील उपाय जाणून घेऊयात.
बद्धकोष्ठतेची लक्षणे काय आहेत?
बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांना शौचास त्रास होतो. तसेच पोटात सतत जडपणा जाणवणे, वेदना होणे, आतड्यांदरम्यान स्नायूंचा ताण येणे, मळमळ होणे आणि उलट्या होणे यासारख्या समस्या देखील जाणवतात. रामदेव बाबांच्या मते वेगाने जेवण केल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. कारण यामुळे अन्न नीट चावले जात नाही, ज्यामुळे पचनक्रियेत अडथळा येतो. तसेच यामुळे शरीराला योग्य पोषक तत्वेही मिळत नाहीत. त्यामुळे शारीरिक कमकुवतपणा येतो.
योग्यरित्या जेवण करणे महत्वाचे
रामदेव बाबा म्हणाले की, बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हळूहळू आणि शांतपणे जेवण करावे, अन्न पूर्णपणे चावावे. दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यासाठी किमान 30 मिनिटे आणि नाश्त्यासाठी 15-20 मिनिटे वेळ द्यावा. यामुळे अन्न नीट चावले जाते आणि तुमची पचनक्रिया सुधारेल.
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी हे पदार्थ खा
रामदेव बाबा यांच्या मते काही पदार्थांचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी पेरू खाणे फायदेशीर आहे. तसेच रिकाम्या पोटी सफरचंद सालासह खावे. हे पचनक्रिया बिघडलेल्यांसाठी औषध म्हणून काम करते. मात्र सफरचंद खाण्यापूर्वी ते कोमट पाण्याने धुऊन घ्या. तसेच पपईदेखील बद्धकोष्ठता दूर करण्यास फायदेशीर ठरते. तसेच 10-15 मनुके आणि 4-4 अंजीर भिजवून खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी होते आणि हिमोग्लोबिनही वाढते आणि अशक्तपणाही कमी होतो.
हे पदार्थ खआणे टाळा
रामदेव बाबा यांच्या मते बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सात्विक, हलके आणि पौष्टिक अन्न खावे. मुलांनी मॅगी, बिस्किटे, चॉकलेट आणि रिफाइंड पीठाचे सेवन केल्याने आतड्यांचे नुकसान होते आणि गॅस व बद्धकोष्ठता होते. तसेच प्रौढांनी जास्त तेलकट आणि जड पदार्थ टाळावेत, यामुळे पचनक्रिया मंदावते.
कपालभाती प्राणायाम फायदेशीर
रामदेव बाबांनी सांगितले की, कपालभाती प्राणायाम बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. दररोज या प्राणायामाचा सराव केल्याने ताण कमी होतो, ऊर्जा वाढते, वजन नियंत्रित होते आणि श्वसन कार्य सुधारते. तसेच खोकला आणि सायनससारख्या समस्यांसाठी देखील हे फायदेशीर आहे.
निरोगी पचनाची लक्षणे काय आहेत?
बाबा रामदेव म्हणाले की, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी दिवसातून तीन वेळा भूक लागणे, गॅस न होणे, योग्य वेळी आतड्याची हालचाल होणे आणि जेवल्यानंतर पोटात जडपणा न जाणवने ही निरोगी पचनाची लक्षणे आहेत. त्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या येत असतील तर तुम्ही ताबडतोब तुमचा आहार सुधारणे गरजेचे आहे.