
डोनाल्ड ट्रम्प तोंडावर; युरोपियन…
भारत आणि अमेरिकेनंतर चीनचे संबंध तणावात आहेत. अमेरिकेने चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला. टॅरिफसोबतच चीनवर अमेरिका गंभीर आरोप करत आहे. चीनवरील टॅरिफची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2025 पासून होईल.
यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार युद्ध पेटण्याची दाट शक्यता आहे. चीन देखील अमेरिकेविरोधात मैदानात आहे. अमेरिकेवर कसा टॅरिफ लावायचा त्याची योजना त्यांनी तयार केली. जगात सध्या एक नवीन राजकीय आणि आर्थिक परिस्थिती निर्माण होत असून, भारत, रशिया आणि चीन एकत्र आली आहेत. दुर्मिळ पृथ्वी खनिजांवर चीनचे नियंत्रण रोखण्यासाठी आम्ही चीनवर टॅरिफ लावल्याचा दावा अमेरिकेकडून केला जात आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेला भारताची मदत हवीये.
भारत आणि युरोपने चीन विरोधात एकत्र यावे अशी अमेरिकेची इच्छा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अमेरिका भारतावर मोठा टॅरिफ लावत आहे आणि त्यांच्या मदतीला भारताने यावे, अशी इच्छा व्यक्त करत आहेत. भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीन आणि भारतामधील संबंध सुधारले असून काही महत्वाचे करार देखील झाले आहेत. यामुळे यावेळी भारत अमेरिकेला साथ देण्याचे अजिबातच संकेत नाहीत.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांना विचारण्यात आले की, दुर्मिळ पृथ्वी खनिजांवरील चीनच्या नियंत्रणापासून अमेरिका स्वतःला कसे दूर ठेवेल. यावर उत्तर देताना त्यांनी म्हटले की, आम्हाला भारतासोबतच युरोपीय देशांकडून पाठिंबा अपेक्षित आहे. ज्याप्रकारे भारतावर अमेरिकेने टॅरिफ लावला त्यानंतर युरोपियन देशांमध्ये अमेरिकेबद्दल संतापाचे वातावरण आहे. ब्राझीलने तर अमेरिकेसोबतचे सर्व संबंध तोडली आहेत.
ब्राझीलवरही भारताप्रमाणे 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, मुळात म्हणजे ही चीन आणि संपूर्ण जगाची लढाई आहे. आम्ही हे होऊ देणार नाही. चीन ही एक कमांड-अँड-कंट्रोल अर्थव्यवस्था आहे. आम्ही वेगवेगळ्या मार्गांनी आमचे सार्वभौमत्व सिद्ध करू. आता चीनविरोधात लढण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दुर्मिळ पृथ्वी खनिजांच निर्यातीवर बंदी चीनने खातल्याने अमेरिकेला मोठा धक्का बसला असून मोठे नुकसान होत आहे.