 
                सुशांतच्या बहिणीचा धक्कादायक दावा; मृत्यूनंतर सायकिकने सांगितल्या या गोष्टी…
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी त्याची बहीण श्वेता सिंह किर्तीने धक्कादायक आरोप केले आहेत. माझ्या भावाने आत्महत्या केली नव्हती, असं तिने म्हटलंय. पत्रकार शुभांकर मिश्रा यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेताने दावा केला की, दोघांनी मिळून सुशांत मारल्याचं तिला अमेरिका आणि मुंबईतील दोन वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या मुंबईतील राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आला होता. त्याच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला होता. मुंबई पोलीस, ईडी, एनसीबी आणि सीबीआय अशा विविध यंत्रणांकडून सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच सीबीआयने याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.
मानसशास्त्रज्ञांदा धक्कादायक दावा
श्वेताने सांगितलं की सुशांतच्या मृत्यूनंतर लगेच एका अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने तिच्याशी कुटुंबातील ओळखीच्या व्यक्तीद्वारे संपर्क साधला होता. “ज्या लोकांना माझ्याशी संपर्क साधला होता. त्यापैकी एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता. माझा तिथे भावासारखा एक मित्र आहे, तो अमेरिकन आहे. जेव्हा त्याला सुशांतच्या घटनेबद्दल समजलं, तेव्हा तो म्हणाला, माझी एक गॉडमदर आहे, जी अत्यंत ध्यानस्थ अवस्थेत जाते, मला तिच्याशी बोलू दे. म्हणून त्याने तिला फोन केला. तिला मी कोण आहे किंवा माझा भाऊ कोण आहे, हे देखील माहीत नव्हतं. ती अमेरिकन आहे आणि तिला आमच्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. तिने मला सांगितलं की, सुशांतची हत्या झाली आहे. दोन लोक आले होते”, असा धक्कादायक खुलासा श्वेताने केला.
दोघांनी केली सुशांतची हत्या?
याविषयी ती पुढे म्हणाली, “मुंबईतील आणखी एका मानसशास्त्रज्ञाने माझ्याशी संपर्क साधला. तिच्याबद्दलही मला काहीच माहीत नव्हतं. तिनेसुद्धा मला तीच गोष्ट सांगितली, जी मला अमेरिकेतल्या गॉडमदरने सांगितली. दोन्ही गोष्टी एकच कशा होऊ शकतात? तुम्हीच सांगा. त्या दोघींनी हेच सांगितलं की, दोन जण आले होते आणि त्यांनी सुशांतची हत्या केली.”
सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट
सुशांतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती पोलिसांच्या रडारवर आले होते. परंतु सीबीआयने नुकत्याच दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये या दोघांनाही क्लीन चीट देण्यात आली आहे. सुशांतला बेकायदेशीरपणे कोंडून ठेवलं होतं, धमकी दिली होती किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं, असे कोणतेही पुरावे नाहीत, असं सीबीआयने रिपोर्टमध्ये स्पष्ट केलंय. सीबीआयला रियाच्या आर्थिक गैरव्यवहाराचेही कोणतेच पुरावे सापडले नाहीत.
सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआयच्या या रिपोर्टला नाकारलं आहे. त्यांचे वकील वरुण सिंह म्हणाले, “ही केवळ डोळ्यांत धूळफेक करण्यात आली आहे. जर सीबीआयला खरंच सत्य बाहेर आणायचं असेल तर त्यांनी सर्व चॅट्स, टेक्निकल गोष्टींचे रेकॉर्ड्स, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय रेकॉर्ड्स यांसह सर्व कागदपत्रे सादर केली असती. आम्ही या क्लोजर रिपोर्टविरुद्ध निषेध याचिका दाखल करू.



 दै चालु वार्ता
                                        दै चालु वार्ता                     
                 
                 
                