पिंपरी चिंचवड प्रतिनिधी -बद्रीनारायण घुगे
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहाटणी येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा व परिसराच्या सुशोभीकरणाबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. पुतळ्याची स्वच्छता, दुरुस्ती, आकर्षक विद्युत रोषणाई तसेच सुरक्षेसाठी रेलिंग बसविण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.
यावेळी प्रभागातील सर्व सहकारी नगरसेवक, स्थापत्य विभागाच्या उपअभियंता वंदना मोरे, कनिष्ठ अभियंता अमित पवार,विद्युत विभागाचे श्री. रोकडे व आसिफ शेख तसेच उद्यान विभागाचे श्री. चाकणकर व श्री. कदम उपस्थित होते.
शिवजयंतीपूर्वी संपूर्ण परिसर सुशोभित व सुरक्षित व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शिवभक्तांना अभिमान वाटावा, असा हा परिसर लवकरच अधिक देखणा होईल!
श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन
(नगरसेवक)
