वसमत (प्रतिनिधी):बालाजी अडकिने
वसमत शहर पोलीस स्टेशन येथे आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तसेच रमजान ईद निमित्त शांतता समितीची बैठक उत्साहात व शांततेच्या वातावरणात संपन्न झाली.
या बैठकीस नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, गटनेते तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी उत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून साजरे करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान मिरवणुकीचे मार्ग, वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा, स्वच्छता आणि सुरक्षा याबाबत नियोजन करण्यात आले. सर्व समाजबांधवांनी परस्पर सहकार्य व बंधुभाव ठेवून सण साजरे करावेत, असे आवाहन करण्यात आले.
ही बैठक पो.नी. सुधीर वाघ साहेब यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
यावेळी सर्व मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.
