इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे अमेरिकेला खुले पत्र !
गुरुवारी (०२ एप्रिल २०२६) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणयुद्धाबाबत अनेक दावे केले.
या युद्धात अमेरिकेच्या विजयाची घोषणा करत त्यांनी यातून माघार घेतली. दरम्यान याच पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेला उद्देशून एक खुले पत्रे लिहिले आहे. या चार पानांच्या पत्रात त्यांनी अमेरिकन लोकांलिषयीचे मत ठामपणे मांडले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अधिकृत अकाऊंटवर हे पत्रे त्यांनी पोस्ट केले आहे.
या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, इराणी जनतेच्या मनात अमेरिकन लोकांविषयी कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक द्वेष किंवा शत्रूत्व नाही. तसेच सध्या सुरु असलेल्या संघर्षाची सुरुवात देखील त्यांनी केलेली नाही. त्यांनी हे पत्र प्रसिद्ध करताना टू द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे कॅप्शन दिले आहे. पेझेश्कियान यांनी पत्रात इराण संस्कृती आणि इतिहासाविषयीची चर्चा केली आहे.
इराण धोकादायक नाही – पेझेश्कियान
पेझेश्कियान यांनी पत्रात म्हटले आहे की, इतिहासात किंवा सध्या वर्तमानकाळात अमेरिकन जनतेला इराण(Iran) कडून कोणताही धोका नाही. अमेरिका, युरोप किंवा इतर मित्र राष्ट्रांबद्दल इराणच्या मनात द्वेष नाही. तर त्यांना धोका म्हणून चित्रित करणे हा केवळ एक राजकीय आणि आर्थिक डाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पेझेश्कियान यांनी १९५३ मधील सत्तापालटाचा उल्लेख करत त्यांच्यावरील निर्बंध आणि लष्करी कायवायांमुळेच दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
इस्रायलवर निशाणा अन् शांततेचे आवाहन
याच वेळी पेझेश्कियान यांनी अमेरिका इस्रायल(Israel)च्या सांगण्यावरुन हे युद्ध लढत असल्याचा थेट आरोप केला. त्यांच्या मते, अमेरिका स्वत:च्या हितासाठी नव्हे, तर इस्रायलचा प्रॉक्सी म्हणून युद्ध लढत असल्याचे म्हटले.तसेच त्यांनी युद्धाच्या परिणामांचा उल्लेख करत जग सध्या अत्यंत नाजूक वळणावर पोहोचले असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, युद्ध अजूनही न थांबल्यास विनाशाच होईल इशारा दिला.
त्यांनी म्हटले की, अमेरिकेला इराणबद्दल जे सांगितले जात आहे, त्या पलीकडे जाऊन पहा. इराणच्या प्रगत, विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या लोकांना भेट द्या. यानंतर तुम्हाला खरे वास्तव लक्षात येईल असे म्हटले.
