युद्धविरामानंतर तेहरानमधील दुतावासाचा इशारा; हेल्पलाइन नंबर जारी…
इराण अमेरिका यांच्यात युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर आता इराण मधील भारतीय नागरिकांना तत्काळ देश सोडण्याचं, आवाहन तेहरानमधील दुतावासाकडून करण्यात आलं आहे. त्यासाठी त्यांनी हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहे.
इतकच नाही, तर भारतीय दुतावासाशी संपर्क केल्याशिवाय बॉर्डर परिसरात जाऊ नये, असंही दुतावासाकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वी ७ एप्रिलरोजीसुद्धा तेहरानमधील भारतीय दुतावासाकडून भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याचा पुढचा भाग म्हणून ही अॅडव्हायझरी जारी करण्यात आल्याचं दुतावासाकडून सांगण्यात आलं आहे.
यापूर्वी ७ एप्रिलरोजीसुद्धा तेहरानमधील भारतीय दुतावासाकडून भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याचा पुढचा भाग म्हणून ही अॅडव्हायझरी जारी करण्यात आल्याचं दुतावासाने म्हटलं आहे.
“७ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या सूचनेच्या पुढील भाग म्हणून आणि अलीकडील घडामोडी लक्षात घेता, इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी दूतावासाशी समन्वय साधून शक्य तितक्या लवकर देश सोडावा, असे या सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ही नवी सूचना विशेषतः संघर्षग्रस्त भागातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर तात्काळ हल्ल्याचा धोका कमी झाला आहे.
अशापरिस्थितीत दक्षिणेकडील बंदर अब्बाससारख्या भागांतून आर्मेनिया सीमेपर्यंत सुमारे १,५०० किलोमीटर प्रवास करणे आता शक्य झाले आहे. अजूनही जवळपास ७,५०० भारतीय नागरिक इराणमध्ये अडकले असल्याची माहिती आहे.
