पाकिस्तानला नारळ देताच थेट भारताला…
इराण आणि अमेरिका युद्धात जग वैतागले आहे. दोन महिने झाले तरीही युद्ध काही थांबत नाही. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धसंधीची घोषणा करण्यात आली. पाकिस्तान युद्धात मध्यस्थी करत आहे. एकच बैठक आतापर्यंत घेण्यात पाकिस्तानला यश आले.
उलट बैठकीनंतर तणाव कमी व्हायचा तर तणाव अधिक वाढल्याचे बघायला मिळाले. जागतिक बाजार या युद्धामुळे संकटात आहे. कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. यादरम्यानच आता अमेरिकेने पाकिस्तानला दणका दिला. इराणकडून पाकिस्तानच्या मध्यस्थीवर संशय व्यक्त केला जात आहे. भारत आणि इराणचे संबंध चांगले आहेत. ज्यावेळी जगासाठी होर्मुज खाडी बंद होती, त्यावेळी होर्मुज खाडीतून भारतीय जहाज सोडले जात होते. या युद्धात भारताने शांततेची भूमिका घेतली आहे. पाकिस्तान युद्धात मध्यस्थी करण्यासाठी सरळ तोंडावर पडल्याचे बघायला मिळत आहे.
यादरम्यानच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्यात फोनवरून चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी होर्मुज खाडीतील परिस्थितीवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. होर्मुज खाडी अत्यंत महत्वाची आहे. कच्च्या तेलासाठी हा महत्वाचा सागरी मार्ग आहे. अराघची यांनी सध्याच्या काही मुद्द्यांवरही चर्चा केली.
अराघची यांच्या म्हणण्यांनुसार जयशंकर यांच्यासोबत सध्याच्या परिस्थिवीर चर्चा केली. दोन्ही देशांचे संबंध चांगले आहेत. नक्की काय चर्चा सुरू आहे, याची माहितीही इराणकडून भारताला देण्यात आली. इराण अमेरिकेसोबत युद्ध थांबवण्याकरिता चर्चा करत असताना भारतालाही विश्वासात घेत आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीला अपयश मिळाल्यानंतर इराण आणि अमेरिका आता फोनच्या माध्यमातून थेट एकमेकांसोबत संवाद साधणार आहेत.
विशेष म्हणजे हा फोन अशावेळी आला, ज्यावेळी पाकिस्तानला मध्यस्थीतून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय दोन्ही देश थेटपणे संवाद साधणार आहेत. होर्मुज खाडीत भारतीय जहाजावर झालेल्या गोळीबारानंतर भारत आक्रमक भूमिकेत होता. त्यावेळी थेट इराणसोबत संवाद साधण्यात आला. अजूनही भारतीय जहाज होर्मुज खाडीत उभे आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी सतत इराणच्या सरकारच्या संपर्कात भारत सरकार आहे.
