
दैनिक चालु वार्ता मिरज तालुका प्रतिनिधी -पोपट माने
महिला पत्रकाराशी उद्धट वर्तन : मिरज तालुका पत्रकार संघटनेचे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
आरग, ता.४ :महाराष्ट्र दिना निम्मित आयोजित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये महिला पत्रकाराशी उद्धट वर्तन करणाऱ्या मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा वादग्रस्त कर्मचारी बीट हवालदार संभाजी पवार यांच्या कारभाराची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी मिरज तालुका पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय अस, (दिं.१ )मे रोजी आरग ग्रामपंचायतीची ग्रामसभा कोरम अभावी तहकूब करण्यात आली. त्यावेळी बीट हवालदार संभाजी पवार हा पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होता. ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी स्वतःच्या दालना मध्ये येऊन बसले. यावेळी महिला पत्रकार उज्वला जाधव या महिला ग्रामसभेच्या कामकाज कामकाजाविषयी आढावा घेत होत्या.
ग्राम विकास अधिकारी व महिला पत्रकार यांच्यात चर्चा सुरू होती. कोणतेही कारण नसताना पार पडलेल्या ग्रामसभेत तसेच वादाचा कोणताच मुद्दा नसताना मिरज ग्रामीणचे वादग्रस्त पोलिस कर्मचारी बीट हवालदार संभाजी पवार यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या दालनात येवून महिला पत्रकारास ओळखपत्र दाखवा ? अशी विचारणा करून त्याना माहिती घेण्यास मज्जाव केला. असे बरेच पत्रकार पाहिलेत अशी उलटतपासणी घेत, अश्या पत्रकारांच्या घरावर बुलडोजर फरविण्याची जबर धमकी देवून अर्वोच्च अवमान केला.
मी महिला पत्रकार आहे. माहिती घेत असल्याचे सांगूनही हवालदार पवार यांची दादागिरी थांबली नाही.पोलिस यंत्रणेला काळीमा फासणार्या वर्तुणुकीबाबत पवार यांच्याविरोधात जिल्हा पोलिस प्रमुखांकडे केलेल्या तक्रारीचे निवेदन अप्पर पोलिस अधीक्षक अधिक्षक मनिषा डुबुले यांच्याकडे दिले. पत्रकारांनी पवार यांच्या भानगडींचा पाडा वाचत पवार यांच्यावर कडक कारवाई करावी, कारवाई न झाल्यास आंदोलन करू असा निवेदनाव्दारे इशारा दिला आहे. या गंभीर तक्रारीची डुबुले यांनी गांभीर्याने दखल घेत कारवाईचे आश्वासन पत्रकारांना दिले.
आरग ग्रामपंचायतीनेही त्याची बदली करावी अशी मागणी एका ठरावाद्वारे केली असून आरग परिसरात चालत असलेल्या अवैध धंद्याना संभाजी पवार याचे पूर्ण पाठबळ असल्याचा आरोप या परिसरातून होत आहे. अशी मागणी मिरज तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष निरंजन सुतार, अण्णा खोत, संतोष पवार, दिगंबर कोकाटे, बाळासाहेब कणके, अरूण निंबाळकर, अविनाश साबळे, पोपट माने आदी पत्रकारांनी निवदना द्वारे केली आहे.