
1) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
उत्तर : नंदुरबार
2) अमरावती येथे ‘ श्रद्धानंद छात्रालय ‘ कोणी सुरु केले होते ?
उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख
3) बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता?
उत्तर : समाजसेवा
4) ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?
उत्तर : आळंदी
5) राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला होता?
उत्तर : कागल
6) हरितक्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला ?
उत्तर : तृणधान्य
7) महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरु झाला ?
उत्तर : 1945
8) ‘रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य / केंद्रशासीत प्रदेश कोणता?
उत्तर : महाराष्ट्र
9) कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ, अजिंठाच्या लेण्याकोरलेल्या आहेत ?
उत्तर : बेसॉल्ट
10) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI National Enviornmetal Engineering Research Institute ) कोणत्या शहरात आहे?
उत्तर : नागपूर
11) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे?
उत्तर : 925
12) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा अधिक आहे, म्हणजेच स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे?
उत्तर : सिंधुदुर्ग
13) गुलामगिरी ‘ हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : महात्मा फुले
14) ‘केसरी ‘या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?
उत्तर : आगरकर
15) महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?
उत्तर : गोऱ्हे
16) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही?
उत्तर : मुंबई शहर
17) महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे?
उत्तर : छतीसगढ
18) ‘मित्रमेळा ‘ ही संघटना वि. दा. सावरकर यांनी कोठे स्थापन केली?
उत्तर : नाशीक
19) भगवतगीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण?
उत्तर : संत ज्ञानेश्वर
20) मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे?
उत्तर : दर्पण
निरंजन मारोतराव पवार
नवी मुंबई पोलीस…