
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा शहरात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. तालुक्यात शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील शेतकरी पेरणीच्या कामाची लगबग करताना शेतकरी साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी कृषी केंद्राच्या पाय-या झिजवत आहेत. मात्र, शेतक-यांना खतांच्या कृत्रिम तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.तालुका कृषी अधिकारी यांनी भरारी पथकाची नेमणूक करून शासनाच्या नियमापेक्षा जादा दराने विक्री करणाऱ्या तालुक्यातील कृषी दुकानदाराच चौकशी करून त्यांचे परवाने तात्काळ रद्द करावे आशी मागणी भाजपा वतिने करणात आली आहे.
गतवर्षी केंद्र शासनाच्या वतीने डीएपी खताच्या पोत्यावर अनुदान वाढ देऊन शेतक-यांचा भार हलका केला होता. मात्र लोहा शहरात गोदावरी, सम्राट ,उत्तम, बिरला, आर सी एफ, शासनाच्या ठरवून दिलेल्या किमती प्रमाणे एका पोत्याची किंमत १३५० असून शेतकऱ्याकडून पोत्यामागे २०० ते २५० रुपये जादा दराने व्यापारी घेतात असे व्यापाऱ्यांचे तहसीलदार व कृषी अधिकााऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा कारवाई न झाल्यास भाजपा तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत कृषी अधिकारी यांना देण्यात आला आहे.
शहरात व्यापाऱ्याकडून बी-बियाणे घेतले तरच खात मिळणार असे शेतकऱ्यांना सांगण्यात आहे .शहरात साठेबाजार केला जात असून, खतांची कत्रिम टंचाई निर्माण करुन पुन्हा शेतक-यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभुमीवर लोहा तालुक्यातील दुकानाची आणि गोदामांची तपासणी करण्याची भाजपा तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार यांनी तहसीलदार यांना निवेदन मार्फत केले आहे.