
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी -प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुक्यात नव्यानेच एका जिल्हा परिषद गटाची निर्मिती झाली असून 02 जुन 2022 रोजी जिल्हा परिषद गट निर्मितीचे परिपत्रक सुद्धा काढण्यात आले आहे त्या परिपत्रकानुसार कंधार तालुक्यातील गौळ या गावाची जिल्हा परिषद गट म्हणून निर्मिती झाली आहे. आणि त्यावर आक्षेप घेण्यासाठी 08 जून 2022 पर्यंतचा अवधी सुद्धा देण्यात आला होता.
त्या अनुषंगाने महाराष्ट्रात पंचायत राज निवडणुकीची लगभग मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा परिषद आणि कंधार पंचायत समिती साठी प्रारुप आराखडा दि.02 जुन 2022 रोजी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रकाशित करण्यात आला आहे.
नवीन जिल्हा परिषद सर्कल निर्मिती करत असताना महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने काही नियम निर्देशित केलेले असून सर्कल मध्ये समाविष्ट गावांपैकी जास्त लोकसंख्या असलेल्या गावाचे नाव सर्कल म्हणून देण्यात यावे याबाबत स्पष्ट निर्देश असून सुद्धा पूर्वीच्या कुरुळा जिल्हा परिषद गटातील गावापैकी 2011 च्या जनगनने नुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या गावाची सर्कस म्हणून निर्मिती न होता पुर्वीच्या कुरुळा जिल्हा परीषद गटा बाहेरील गावाची अर्थातच कंधार तालुक्यातील गौळ या लोकसंख्येने कमी असलेल्या गावाची (59 – गौळ ) या नवीन जिल्हा परिषद गटाची निर्मिती करण्यात आली आहे.
या सर्कलची निर्मिती करताना प्रशासनाने केलेल्या चुकांचा अहवाल जनतेसमोर मांडत आहे सदर प्रस्ताव आराखड्यावर कंधार तालुक्यातील 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे असलेले गाव दिग्रस ( बु ) या गावाची म्हणून निर्मिती केली नसल्यामुळे कंधार तालुक्यातील दिग्रस ( बु ) येथील जानकर व अभ्यासु व्यक्तिमत्त्व मा.आप्पाराव पाटील शिंदे यानी आक्षेप घेतल्या नंतर एक नवीनच माहिती समोर आली आहे .
8 जुन 2022 रोजी मा.तहसीलदार साहेब कंधार यानी दिलेल्या माहितीनुसार अर्थातच पत्रानुसार पुर्वीच्या कुरुळा सर्कल मधिल मौजे दिग्रस ( बु ) या गावाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार अंदाजे 4246 एवढी ती इतर समाविष्टीत 18 गा्वा पेक्षा जास्त आहे याउलट मौजे गौळची लोकसंख्या मोजताना अर्थातच जनगणना करताना प्रशासनाने मानसिंगवाडी ग्रामपंचायत ( निर्मिती 1985 ) , भोजुचीवाडी ग्रामपंचायत ( निर्मिती 1984 ) या गावांची लोकसंख्या वेगळी न धरता हा मौजे गौळ मध्ये एकत्रित धरलेली आहे ती एकत्रित भरलेली असून सुद्धा 2011 च्या जनगणनेनुसार अंदाजे 3883 एवढी आहे यावरून हेच प्रशासन वित्त आयोगाचा निधी वाटप वेगवेगळ्या ग्रामपंचायतला कसा निधी वाटप करतो ? हा प्रश्न जनते समोर उपस्थित राहतो. त्यासोबतच मौजे दिग्रस ( बु ) ची मतदार संख्या मौजे गौळ पेक्षा अंदाजे 1037 जास्त असून सुद्धा मौजे दिग्रस ( बु ) या गावास जिल्हा परिषद सर्कल म्हणून घोषित न करता कंधार तालुक्यातील नवनिर्माण झालेल्या ( 59 – गौळ ) या जिल्हा परिषद गट निर्मिती वर दिग्रस ( बु ) येथील अभ्यासु व जाणकार व्यक्तिमत्व माननीय आप्पाराव पाटील शिंदे यांनी प्रशासन दरबारी ( 59 – गौळ ) या नवीन जिल्हा परिषद सर्कल निर्मितीवर आक्षेप घेतला आहे आणि प्रशासनाने केलेली चूक सुधारावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि जनतेतून सुद्धा हाच सूर ऐकावयास मिळत आहे.