
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : विश्वाला मोहिनी घालणारे, आपल्या चित्रकाराच्या जादुईने लोकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे आज शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ८७ वर्षें वयाचे होते. काही दिवसांपासून ते पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. परांजपे ह्यांचा जन्म १९३५ साली बेळगाव येथे झाला. परांजपे बोधचित्रकार म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. जाहिरात आणि प्रकाशन या क्षेत्रात महत्वाची ठरणारी बोधचित्रकला, लावण्य योजना कला, वास्तूबोधचिकला आणि स्वान्त सुखाय सृजनात्मक चित्रनिर्मिती अशा विविध अंगांना त्यांच्या ब्रशने सहज स्पर्श होतो. आपल्या वैविध्यपूर्ण चित्रनिर्मिती मध्ये प्रतिभेचा, प्रज्ञेचा आणि अभ्यासपूर्ण चिंतनाचा ते प्रत्येय देत आले आहेत