
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम :-तालुक्यातील आरसोली येथे पशुवैद्यकीय दवाखाना आष्टा अंतर्गत वंध्यत्व निवारण व गोचिड निर्मूलन शिबिर संपन्न झाले . यामध्ये १८० पशूंची तपासणी करण्यात आली .
या शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच प्रशांत मुंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.ए. दुगम , मदर डेअरी सुपरवायझर किरण गायकवाड , मदर डेअरी चेअरमन आरसोली गुरुराज गिरम , सुनील पाटील , शिवाजी गिराम , बापूराव चंदनशिवे , आण्णा पाटील , उल्हास सातपुते , सुदाम नागटिळक बापूराव पाटील , महेश पाटील , सुरज पाटील , किरण पाटील , अमोल नरुटे , संदीप खराडे , बालाजी जठार , लक्ष्मण खराडे , लक्ष्मण पाटील , सोमनाथ पाटुळे सह पशुपालक उपस्थित होते.