
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
नगारा ताशाच्या वाद्यमय वातावरणात पन्हाळसह परिसरात मोहरम सणाला उत्साहात सुरुवात झाली असुन पन्हाळा येथील हजरतपीर शहादुद्दीन दर्गामध्ये पंजातन पंजांची ,मुतवल्ली मुजावरांचा पंजा व बाराईमाम मशिद येथे बार पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.तर पन्हाळ्यातील हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या नाल्या हैदर पंजा ,नाल्या हैदर मशिदी मधील बुरूड पंजा,अंबिलढोक पंजाची व ,बाराईमाम येथेही कुमार गवंडी यांचा अली जुल्फिकार पंजा,कासे पंजा,शेक पंजा , तर हैदर मशिद येथे गारदी पंजा,आगा पंजा,भोसले गल्ली येथील भोसले पंजा,बाजीप्रभु पुतळा येथील कांबळे पंजा,मोकाशी पंजा यांची विधीवत प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.त्याचबरोबर हिंदू मुस्लिम ऐकायचे प्रतीक असलेला नाल्या हैदर पंजा मशिद येथे भजनी मंडळ कार्यक्रम उत्साहात पारपडला यावेळी पन्हाळा येथील महालक्ष्मी भजनी मंडळ यांच्यामार्फत हे भजन कार्यक्रम आयोजित केला होता पन्हाळा सह परिसरातील पावनगड,मंगळवारपेठ,सोमवारपेठ,आपटी,रविवारपेठ,नेबापुर,रामापुर येथेही पीरपंजाची प्रतिष्ठापणा करण्यात आली असुन आज पासुन सर्व पंजै दर्शनासांठी खुले होणार आहेत.दिनांक ७ व ९ रोजी पंजे भेटींचा कार्यक्रम पार पडणार आहे.यावेळी मंगळवारपेठ,रामापुर येथील पंजांच्या बरोबर कोल्हापुरातील दिलबहार मंडळांचा पंजा,बाबुजमाल तालीम मंडळाचा पंजा,घिशाड गल्लीचा पंजा जिल्ह्यातील आदी गावातील पंजे भेटीसाठी पन्हाळ्यात दाखल होतात.तर दिनांक ८ रोजी खत्तल रात्र साजरी करण्यात येणार आहे.तर ९ रोजी मोहरम सणाची सांगता होऊन दफन विधीचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती हरून अब्दाल व हनिफ नगारजी यांनी दिली.
मोहरम सणाला पंजांना रोट व चौगें याखाद्यपदार्थांचा निवेद्य दाखविले जाते त्यामुळे महिला वर्गांच्यात रोट व चौंगे तयार करण्याती लगबग सुरु आहे