
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : पावसाबाबत आता एक अतिशय महत्त्वाची बातमी. कालपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार हा पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे.
राज्यात कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागात अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.