
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:धनाजी जोशी सामाजिक कार्यकर्ते यांनी केक वगैरे कापण्यापेक्षा त्यांनी राष्ट्रीय कार्यात हातभार लावून यांच्या तर्फे राम भक्त निरंजन रायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्ताने हर घर तिरंगा अभियानांतर्गत घरावर लावण्यासाठी तिंरगा भेट दिले.
वाढदिवसाच्या निमित्ताने काहितरी देश हिताचे अभियान अंतर्गत एक छोटीशी भेट म्हणून हर घर तिरंगा अभियानांतर्गत घरावर लावण्यासाठी तिंरगा भेट.
धनाजी जोशी यांच्या वतीने देण्यात आले असेच सर्वांनी केक हार फुगे मध्ये पैसे वाया न घालता असेच काहीतरी सामाजिक व देश हिताचे कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्याने आयोजन केले तर सर्व समाजामध्ये नक्कीच देशभक्तीची भावना निर्माण होईल खरंच धनाजी जोशी च्या या उपक्रमांनी सर्व समाजामधील नागरिकांनी आदर्श घेतला पाहिजे या कार्यक्रमाला सुमित अण्णा कांबळे व्यंकटेश उरलागोंडावार विक्रम नागशेट्टीवार अमित कांबळे रोहित कांबळे यांच्या सह अनेक जण उपस्थित होते….