
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा येथील एज्युकेशनल पावर प्रि इंग्लिश स्कूल मध्ये रक्षा बंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
एजुकेशनल पावर प्रि इंग्लिश स्कूल लोहा आज 12 ऑगस्ट 2022 वार शुक्रवार शाळेमध्ये बहिण – भावाचा नाते दृढ करणारा ,आपुलकी , प्रेम, स्नेह वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन शाळेतील जेष्ठ शिक्षक बुध्दे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश पाटील पवार होते .
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनीनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बुध्दे सर , प्रमुख पाहुणे अविनाश पाटील पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले राखी सणाचे महत्त्व पटवून सांगितले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षिका शिक्षकोतर कर्मचारी उपस्थित होते.