
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
युवा सरपंच बसवेश्वर धोंडे यांच्या पुढाकाराने गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सध्या देशात मोठया उत्साहात 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. देशाचे पंतप्रधान मा. ना. नरेद्र भाई मोदी यांनी देशाच्या अम्रतउत्सवात देशातील प्रत्येक नागरिकाला सहभागी होता यावे म्हणुन ” हर घर तिरंगा, घर घर तिरंगा” ची घोषणा केली. यात लोहा तालुक्यातील शेवडी (बा.) ग्रामपंचायत च्या माध्यमातुन युवा सरपंच बसवेश्वर धोंडे व त्यांच्या सहकार्याच्या पुढाकाराने गावात मोफत तिरंगा झेंन्डाचे व झेंन्डयांच्या काटी चे वाटप करण्यात आले. शेवडी (बा.) गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत च्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मोठया उत्सवात आपल्या घरावर तिरंगा लावण्यात आले. आज पर्यत 835 लोकांनी स्वत:ची आँनलाईन नोंदणी केली. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास धोंडे (मा. सरपंच), बसवेश्वर धोंडे( सरपंच),दत्तात्रय यजगे (उपसरपंच), संगमेश्वर चपटे(ग्रा.पं.सदस्य), शेख रौफ लालामियाँ (ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी), पुंडलिक ईदुलवड(ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी),अरुण राईकवाडे, अमोल पांडे, बंन्डु घुंगराळे, लिंगेश्वर डोंगरे, रोहिदास वत्ते, संदिप एरंडे इ. सह गावातील तरुणांनी पुढाकार घेतला