
दैनिक चालु वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी – माधव गोटमवाड
मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी व व्यसनमुक्ती अभियात शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
दिनाक 14 ऑगस्ट 2022 रोजी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस 2 तारखेला व भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस तथा युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस 4 तारखेला होता .त्यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे श्रीक्षेत्र माळेगाव येथे मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी व व्यसनमुक्ती अभियात शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरासाठी डॉ.आर .एन.लकोटिया,डॉ.अपूर्वा
मॅडम,डॉ.गणेश जोगदंड ,डॉ.शेख साहेब ,डॉ. चोले साहेब ,डॉ.सविता गुरव इत्यादी डॉक्टर उपस्थित होते.
9 वर्षापासून कै. रुस्तुमराव धुळगंडे यांनी सुरू केलेलं आरोग्य शिबीर माळेगाव येथे त्यांचे चिरंजीव हणमंत धुळगंडे उत्तम रित्या त्यांचा वारसा समोर नेत आहेत. या नेत्रतपासणी शिबिरात अगोदर 472 व आज 30 असे एकूण 502 जनाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. आज तपासणी मध्ये 150 जनाची तपासणी करण्यात आली त्यामध्ये मोतीबिंदू असलेले 30 पेशंट निघाले आहेत त्यांच्यावर ऑपरेशन उदगीर येथे उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे .तसेच पहिली वेळेस आरोग्य तपासणी माळेगाव येथे ठेवण्यात आली होती या तपासणीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आरोग्य तपासणी केली .आरोग्य तपासणी. 300 चया वर झाली आहे . तसेच माळेगाव येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात वृक्षारोपण करण्यात आले.
सलग नऊ वर्ष नेत्रदान शिबिर माळेगाव येथे घेऊन 502 जनाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली त्याबद्दल उदगीर येथील उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय तर्फे हणमंत रुस्तुमराव धुळगंडे यांना सहकार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विलासराव गौकोंडे सर (मा.विस्तारअधिकारी) ,
स्वागताध्यक्ष मा. डॉ.संजय वारकड पाटील .
प्रमुख पाहुणे मा.चंद्रमुनी मस्के ( मा.जी. प.सदस्य), मा.देविदास गित्ते (मा.जी. प.सदस्य) ,नरेंद्र गायकवाड (मा. उपसभापती लोहा),मा. पप्पु नाईक ( पालखी चे मानकरी बेरली),मा.संजय नाईक (पोलीस पाटील रीसनगाव),मा.रामदास हाके (गौडगाव),मा.भीमराव नाईक (रिसनगाव), ,मा.पंडित फाजगे(मजरेसांगवी),मा.बाळू पाटील, ,मा.गणपत जाधव (चोंडी), मा.गोविंद हपगुंडे,मा.नवनाथ पोले,मा. नामदेव पोले ,मा.प्रभाकर सुरनर(घोटका) ,मा.दगडु पाटील (रामतीर्थ ) ,मा.शंकर धुळगंडे (रामतीर्थ) ,मा.विठ्ठल सुरणर (घोटका) ,मा.संभाजी धुळगंडे(ग्रामसेवक ) , मा.बरुरे सर .उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – अंतेश्र्वर फुगनर यांनी केले तर
आभार प्रदर्शन संग्राम धुळगंडे यांनी केले.
यावेळी उपस्थित आयोजक : मा. बालाजी नंदाणे (उपसरपंच), सदस्य मा. गोपाळ पाटील, सौ. सारजाबाई धुळगंडे मा. बाबुराव वाघमारे, मा.पारोजी वाघमारे, मा.गुणाजी जोंधळे, मंजुळा वाघमारे, मा. अंबादास जाहगीरदार मा. लक्ष्मण वाघमारे, मा. राजकुमार पाटील, मा.रामेश्वर धुळगंडे, मा. भाऊसाहेब वाघमारे, मा.गोविंद भोरे मा. केशव धुळगंडे, मा. सुहास देमगुंडे, मा.चंद्रकांत गौकोडे, मा. दशरथ मोरे, मा. अनिल राठोड, मा. शिवाजी साखरे, मा. श्याम पवार, मा. परमेश्वर मुस्तापुरे, मा. गौतम वाघमारे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संयोजक – मा.हनमंत रुस्तुमराव धुळगंडे सरपंच श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा व सर्व मित्र परिवार.