दैनिक चालू वार्ता सातारा प्रतिनिधी-संभाजी गोसावी
१४ ऑगस्ट म्हटलं की माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते मराठवाड्यांसह महाराष्ट्रांसाठी तो काळा दिवस होता साहेब असते तर महारांष्ट्र कसा असता? हा विचार वारंवार मनामध्ये येतो आज सकाळी फेसबुक वर देशमुख साहेबांचा फोटो शोधत होतो तेवढ्यांत मिळते साहेबांचा फोटो दिसला स्कॉल केला. तर पुन्हा मेटेल साहेबांचा फोटो दिसला सोबतचा मजकूर वाचून विश्वांसच बसत नव्हता. ती बातमी खोटी ठरावी म्हणून तासभर वाट पाहिली पण ती बातमी खरी ठरली. शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरती झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे यांच्या झालेल्या निधंनाने महाराष्ट्रांच्या राजकीय वर्तुळात मोठा हादरा बसला. ते ५२ वर्षाचे होते. बीड जिल्ह्यांतून राजकीय, पार्श्वभूमी आपले नेतृत्व सिद्ध केले.मराठा समाजांच्या मागण्यांसाठी नेहमीच आग्रही आणि आक्रमण असणारे एक तडफदार नेतृत्व महाराष्ट्रांने आज गमावले आहे. मेटे यांच्या कुटुंबीयांना या धक्कादायक दुःखांतून सावरण्यांचे बळ देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मेटे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली तर देशमुख साहेबांना विनम्र अभिवादन.
