दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
(श्रीकृष्णाने दहीहंडी वर थराला जाऊन फोडली त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात एक एक पायरी चढुन यश मिळवावे.. ॲड.पवन मेहेंगे)
मोताळा :-आदर्श गाव सिंदखेड येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे दहीहंडीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडत असतो या वर्षी सुद्धा दहीहंडीचा कार्यक्रम अतिशय उसामध्ये पार पडला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती म्हणून गावातीलच प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.पवन मेहेंगे यांची उपस्थिती कार्यक्रमाला होती. व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याप्रसंगी चांदणे सर ,वाघ सर, व जिल्हा परिषदचे सहकारी शिक्षक अजय मराठे सर, सौ.स्वाती आकाश गरुड मॅडम यांनी गेल्या आठ दिवसापासून विद्यार्थ्यांची लेझीम, खेळ, असे अनेक प्रकारचे प्रात्यक्षिक घेऊन त्यांना एक विद्यार्थी श्रीकृष्णाच्या वेषभुषा मध्ये आणि एक विद्यार्थिनी राधेच्या वेषभुषा होते विद्यार्थिनी गवळणी, विद्यार्थी कानाचे सवंगडी म्हणून वेशभूषा गोपाळकाल्यासाठी दहीहंडीसाठी तयार केले असून अतिशय उत्कृष्ट तरी त्यांनी त्यावरती संस्कार टाकत आहे. प्रसंगी जिल्हा परिषदेतील सर्व विद्यार्थी उपस्थिती होते.
