दैनिक चालू वार्ता पेठवडज सर्कल प्रतिनिधी- आनंदा वरवंटकर
पेठवडज :- पेठवडज येथील प्रदीप सुरेशराव मुगावे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पेठवडज सर्कल प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.नांदेड उपजिल्हाप्रमुख श्री.भालचंद्र नाईक, उपजिल्हाप्रमुख श्री.बाळासाहेब कर्हाळे , कंधार तालुका अध्यक्ष श्री.परमेश्वर जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच समाजाच्या तळागाळातील सर्वच घटकांपर्यंत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ८०% समाजकारण आणि २०% राजकारण हे उद्दिष्ट असलेल्या आपण सक्रिय शिवसैनिक आहोत ही अभिनंदनीय बाब आहे.म्हणूनच आपण आजवर पक्षासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आपली पेठवडज सर्कल प्रमुखपदी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडावी. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले आहे.
