
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर (प्रतिनिधी)
देगलूर नगरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे युवक शहर कार्याध्यक्ष हबीब रहेमान यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार सावकार यांच्या अत्यंत निकटचे व विश्वासू म्हणून हबीब रहेमान यांची ओळख आहे. प्रत्येक सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणारे तसेच पक्षनिष्ठ कार्यकर्ता अशी ओळख असणारे हबीब रहेमान यांनी लक्ष्मीकांत पदमवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे फळ वाटपाचे कार्यक्रम आयोजन करून सबंध राष्ट्रवादीच्या पदाधिकारी तथा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूर्णत्वास नेले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, तालुकाध्यक्ष अंकुश देशाई, शहराध्यक्ष आसिफ पटेल, बाबर देशमुख, माजी नगरसेवक निसार देशमुख, शैलेंद्र चव्हाण, सय्यद मोहियोदीन,नाना मामा मोरे, मोईन भाई, शरिफ मामू, बंडू पाटील,सूमित कांबळे, शशांक पाटील, ॲड.रज्जाक भाई,इर्शाद पटेल, सुजित सुर्यवंशी, विक्रम नागशेटीवार, साई गदपवार, माधव फुलारी,सोहेल चाऊस, मोहसीन भाई, गजू कांबळे, शुभम चैनपुरकर, किरीशना माळेगावकर , ओमकार उल्लेवार, सुरज सोनकांबळे अमोल यशमवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.