
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील करडखेड सर्कल मधील काँग्रेस असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अंकुश देसाई देगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व पारनेरचे आमदार निलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केले आहेत. गेल्या काही दिवसापासून काँग्रेस मधील जेष्ठाना कंटाळून नाराज असलेले करडखेड मधील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या विचारावर प्रेरित होऊन पक्ष प्रवेश केले आहेत. काँग्रेस पक्षामध्ये खऱ्या कार्यकर्त्याला डावळून पुढे पुढे करणाऱ्याला आमदार निधी जिल्हापरिषद निधी दिले जाते. म्हणून करडखेड मधील काँग्रेस कार्यकर्ते तथा तंटा मुक्तअध्यक्ष अहमद कुरेशी व विश्वनाथ राचलवार, मुन्ना राचलवार, सुरेश शिंदे त्यांच्या सह असंख्य काँग्रेस चे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मध्ये प्रवेश केले आहेत. या वेळी राष्ट्रवादीचे आसिफ पटेल, माधव अण्णा फुलारी, निसार देशमुख, शशांक पाटील, विकास नरबागे, कृष्णा मालेगावकर, सुमित कांबळे, शुभम चैनपुरे, हबीब रेहमान, गजू कांबळे, सूरज सोनकांबळे, साई गंदपवार, ओमकार उल्लेवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.