
दैनिक चालू वार्ता संभाजीनगर प्रतिनिधी- शितल रमेश पंडोरे
————————————————–
संभाजीनगर:- खरीप हंगाम २०२२ चा सोयाबीन पिक विमा भरलेला अद्याप निवघा ( बा .) ता . हदगाव येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत अद्याप जमा च झाला नसल्याने निवघा बाजार परीसरातील शेतकरी पिक विम्या च्या लाभा पासून वंचित च आहेत . पिक विम्याची २५% टक्के अगाऊ रक्कम इतर सर्वच बँकेत एका महीण्या पूर्वी जमा झाली नाही परंतू आयएफसी कोड च्या घोळा मुळे अद्याप निवघा ( बा .) येथील आयडीबीआय बँकेत जमाच झाला नाही या बाबत ६ डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते महेश बोरकर पाटील यांनी जिल्हाधीकारी साहेब नांदेड यांना लेखी निवेदन देऊन तक्रार केली होती परंतू तक्रार करुन अकरा दिवस लोटले तरी अद्याप पिक विमा जमा झाला नसल्याने शेतकरी पिक विम्याच्या प्रतिक्षेत आहेत .