
दैनिक चालु वार्ता तालुका मुखेड प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय हे तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत सर्वप्रथम संघ ठरला आहे . मागील अनेक दिवसांपासून तालुकास्तरीय विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आले होते . यापैकी क्रिकेट स्पर्धेत शाहीर अण्णाभाऊ साठे कनिष्ठ महाविद्यालय , मुखेड या संघाचा पराभव करून यश मिळविले आहे . विजयासाठी 141 इतक्या धावसंख्येचे लक्ष होते . ते लक्ष अतिशय सुरेख खेळ करत पूर्ण केले .
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी , पर्यवेक्षक प्रा.जी.एम.वायफणकर , क्रीडा मार्गदर्शक डॉ. जे.जी.कहाळेकर , डॉ. एस.बी.गायकवाड , तालुका क्रीडा संयोजक प्रा.एन.आर पोटफोडे , प्रा .सुधीर लांडगे , प्रा.गंदपवाड तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करून कौतुक केले जात आहे .