
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अमरावती जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. यामध्ये ८३५ मतदान केंद्रांवर शनिवारी दुपारपर्यंत पाय रवाना होतील. यामध्ये ९३ मतदार केंद्रे संवेदनशील आहेत. या केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा राहणार आहे. याशिवाय मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची तयारी निवडणूक विभागाने ठेवली आहे.मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुटी जाहीर करण्यात आली आहे.८३५ मतदान केंद्रांवर १,६८,८८० महिला व १,८१,३३८ पुरुष व इतर ३ मतदार हक्क बजावणार आहे. १२७० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे.
७० बस,१७५ जीप पथकांच्या मदतीला
मतदान पथक व ९४ क्षेत्रीय अधिकान्यांसाठी ७० बस व १७५ जीपचा वापर केल्या जाणार आहे.मेळघाटातील दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर शुक्रवारी सायंकाळीच मतदान पथके रवाना करण्यात आलेली आहे.धामणगाव व तिवसा तालुका वगळता सर्वच तालुक्यांत बसचा वापर करण्यात येणार आहे.
संबंधित क्षेत्रात कलम १४४ लागू
मतदान असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात रविवारी मतदान केंद्रावर संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आलेली आहे.तसे आदेश निवासी जिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी जारी केले आहेत.मतदान पथके शनिवारी सायंकाळी मतदान केंद्रावर पोहचणार असून पोलीस अधिकारी ७०,पोलीस कर्मचारी १२००,गृहरक्षक दल कर्मचारी ९००,एस आर पी पी एफ प्लाटून ०१ असा बंदोबस्त तैनात असणार आहे.