
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड :- महाराष्ट्र द्रोही विरोधात हल्लाबोल या महामोर्चाला नांदेड येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते डॉ. उत्तमराव सोनकांबळे साहेब व त्यांचे इतर सहकारी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा महामोर्चा मध्ये उत्स्फूर्त असा सहभाग होता. महाराष्ट्राद्रोही विरोधात हल्लाबोल’ या महामोर्चाच्याला लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातील जनता तसेच महाआघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी व मित्र पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य मुंबईकर, पुणेकर, नांदेडकर, नाशिककर, संभाजीनगरकर, तसेच सर्व महाराष्ट्रातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांना आपला आदर्श तथा दैवत मानणारी सर्वसामान्य जनता यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आजच्या मोर्चाला होता अतिप्रचंड विराट असा महामोर्चा आज मुंबई येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य सरकारचा मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेला भोंगळ कारभार, श्री.छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व इतर महापुरुषांविषयी सत्ताधाऱ्यांकडून होणारी बेताल वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी अशा विविध समस्यांविषयी हा महामोर्चा आयोजित करण्यात आला होता.
या मोर्चाला प्रमुख नेतृत्व, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब, मा. अजितदादा पवार साहेब (मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) मा. श्री. नाना पटोले (प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस महाराष्ट्र राज्य) मा. ना. श्री. जयंतरावजी पाटील साहेब (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश) मा. खासदार सौ. सुप्रियाताई सुळे (गटनेत्या, लोकसभा) श्री. अशोकरावजी चव्हाण साहेब (मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) कॉंग्रेसचे नेते आणि मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती होती.