
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
(येलघोल,ता – मावळ पुणे दि 18 डिसेंबर )
जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत जवळील येलघोल या गावापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर असलेले इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील येलघोल बुद्ध लेणी, या ठिकाणी लेणी एकजूट संवर्धन समूह महाराष्ट्र राज्य आणि पुणे विभागाच्या वतीने बुद्ध लेणी स्वच्छता अभियान आणि एक दिवसीय कार्यशाळा व येणाऱ्या पर्यटकांना लेणी विषयी माहिती होण्यासाठी भंते महामोग्गलयान यांच्या हस्ते माहिती व नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
मावळ प्रांत आधुनिक पुणे जिल्हा हा प्राचीन काळापासून समृद्ध असून जिल्हा रचनेनुसार जिल्ह्यात, देशातील सर्वात जास्त लेण्या कोरल्याच्या आढळते. प्रदेशातून प्राचीन व्यापारी मार्ग व मावळ तालुक्यातून जाणाऱ्या भोर घाटाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात लेण्या कोरल्या गेल्या आहेत. मावळ तालुक्याचा प्रथम उल्लेख कार्ले बौद्ध लेणी मामाडे आहार म्हणून पहायला मिळतो. कार्ले, भाजे, पाटण, बेडसे, येलघोल, शेलारवाडी, भंडारा, भामचंद्र या लेण्याची रांग या मार्गावर पाहायला मिळते . येलघोल ही बुद्ध लेणी दुर्लक्षित असून स्थानिक परिसरात गडद म्हणून ओळखले जाते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकजुट लेणी संवर्धन समूह आणि पुणे विभाग आणि स्थानिक गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन म्हणून विवेक वाघमारे, दादुस डोळस यांनी काम पाहिले तर लेणी विषयी सविस्तरपणे बोधिसत्व यूट्यूब चॅनल चे सर्वेसर्वा सागर कांबळे, मनोज गजभार यांनी माहिती दिली.
भंते महामोग्गलयान यांनी उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांना त्रिसरण पंचशील आणि प्रवचन दिले. पुणे विभागातील नियोजनाची धुरा युवा योद्धा सूरज सोनकांबळे यांनी सांभाळली. या वेळी सोलापूर जिल्हा विभागातून अर्चना मेघेरी तसेच लातूर जिल्हा विभागातून राजकुमार सोनकांबळे यांचा एकजूट लेणी संवर्धन महाराष्ट्र राज्य,वतीने ओळखपत्र देऊन सन्मान करण्यात आला.कार्यशाळेत महाराष्ट्राचे विविध जिल्ह्यातून जवळपास शेकडो बौद्ध उपासक आणि उपासिका उपस्थित होते.
भंते महामोग्गलायन यांनी महाराष्ट्रातील बौद्ध लेणी चा प्रचार आणि प्रसार व संवर्धन करण्याचे जनतेस आवाहन करण्यात आले. लेणी ह्या भिक्कू संघ च्या साठी भिक्कू निवास आहेत म्हणून पुरातत्व विभाग ने लक्ष देऊन ज्या ज्या बुद्ध लेनीवर अतिक्रमण झाले ते या पुढे होऊ नये हि काळजी घ्या असे आव्हान करण्यात आले.