
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
दि 15 डिसेंबर 2022 (किरकीटवाडी पुणे )
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या जय्यत तयारीसाठी मनसेने कंबर कसली असून राज ठाकरे स्वतः पुणे महानगरपालिकेमध्ये लक्ष घालत आहेत तसेच कार्यकर्त्यांचे मनोबळ उंचावण्याकरिता त्यांच्या मतदारसंघानुसार बैठका व भेटीगाठी घेत आहेत याच कार्यक्रमाचा पुढील टप्पा म्हणून येत्या 27 डिसेंबर रोजी खडकवासला मतदारसंघातील धायरी येथील मनसे कार्यालयास ते भेट देणार आहेत तसेच मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करणार आहेत भेटीगाठींच्या तयारीसाठी खडकवासला मतदारसंघांमध्ये यासाठी लवकरचं बैठकीचे आयोजिन केले जाईल असे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष विजय मते यांनी यावेळी बोलताना सांगितले तसेच त्यांच्या भेटीमुळे निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे उमेदवार असतील कार्यकर्ते असतील यांच्याशी ते सविस्तर चर्चा करणार आहेत . “खडकवासला मतदारसंघांमध्ये आगामी काळामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आणता येतील यावर आमचा आणी आमच्या पक्षाचा भर असेल व याकरिता वाटेल ते कष्ट करण्याची संघर्ष करण्याची आमची तयारी असेल” असे खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष विजय मते यांनी सांगितले