
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बिडकीन ग्रामपंचायतमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यांची सत्ता आली आहे. आहे.तसेच वैजापूर तालुक्यातील महालगाव मध्ये सुध्दा ठाकरे गटाचे सत्ता आली आहे.बिडकीन ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ठाकरे गटाचे उमेदवार अशोक धर्मे यांचा विजय झाला आहे. अशोक धर्मे 1200 मतांनी विजयी झाले असून, शिंदे गटाचे उमेदवार बबन ठाणगे यांचा पराभव झाला आहे. ठाकरे गटासाठी हा विजय महत्वाचा समजला जात आहे. तर भुमरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल हाती येत आहेत. दरम्यान पैठण तालुक्यातील बिडकीन ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वच जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण याच गावात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅली काढल्या होत्या. तर औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांची प्रतिष्ठा देखील याठिकाणी पणाला लागली होती.
त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी चुरीशीची लढत पाहायला मिळाली होती. मात्र अखेर या ग्रामपंचायतवर ठाकरे गटाचा भगवा फडकला पैठण तालुक्यातील एकूण 22 ग्रामपंचायतीसाठी 94 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली होती. यावेळी 20519 स्त्री आणि 23589 पुरुष असे एकूण 44108 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे पैठण तालुक्यात एकूण 86.64 टक्के मतदान झाले आहे.