
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मुखेड ( ग्रा.)- शिवकुमार बिरादार
महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार,थोर, आधुनिक मराठी संत व समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचा स्मृतिदिन मुखेड येथील जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश स्कूलमध्ये साजरा करण्यात आला.
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचा स्मृतिदिनाचे औचित्य साधून शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी गाडगे बाबा यांच्या वेषात येऊन सर्व विद्यार्थ्यांचे मने जिंकली. भाषणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना घेऊन गाडगे महाराज यांच्या वेषात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात स्वछता केली. पोतदार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयता सिनिअर केजी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट परिपाठ सादर केला.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक जगदीप जोगदंड , संस्थापक ज्ञानोबा जोगदंड यांची उपस्थिती होती. प्रथम राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक जगदीप जोगदंड यांनी भाषण केले. अध्यक्षीय भाषणात ज्ञानोबा जोगदंड यांनी गाडगेबाबांनी शिक्षण प्रसारासाठी शाळा, वसतिगृह, महाविद्यालय काढण्याचं काम केलं. तत्कालीन समाजाला अंधश्रद्धेपासून दूर करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं होतं. शिक्षणामुळे मानवाचा, समाजाची प्रगती होते. गाडगेबाबा म्हणायचे “मायबापहो तुम्हाला काहीतरी मिळालं पण तुमच्या मुलाबाळांच्या नशिबी तेही येणार नाही, शिक्षण हे मोठं पुण्याचं कामं आहे, आपण शिका व इतरांनाही शिकवा.अंधश्रद्धेला बळी पडू नका हा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. सामुहिक संविधान घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्व शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह बहुसंख्येनी विद्यार्थी उपस्थित होते.