
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील २८ ग्रामपंचायत निवडणुकीत सहा ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड झाल्याने २२ ग्रामपंचायतसाठी निवडणुक प्रक्रिया होऊन बहुतांश ग्रामपंचायतीत मतदारांनी प्रस्थापितांना हादरे देत नवख्या उमेदवारांच्या हाती गावाच्या कारभाराची धुरा मतदारांनी काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांना धक्के देत नवख्याच्या हाती सत्ता देऊन ‘दे धक्का’दायक निकाल लावले आहेत. काही ठिकाणी परिवर्तन झाले तर कुठे ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था पहायला मिळाली.
*लोहा – कंधार मतदारसंघात प्रस्थापितांना , लबाड लांडग्यांना , डावळुन जनतेनी नव्यांना संधी देत विरोधकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे कार्य लोहा – कंधार मतदारसंघातील जनतेने केले* – एकनाथ दादा पवार ( भाजपा प्रवक्ते महाराष्ट्र राज्य )
लोहा तालुक्यात मन्याड सुर्योदय फाॅन्डेशनने जोरदार मुसांडी मारत प्रदिप पा फाजगे ( दगडसांगवीकर ) पप्पु नाईक बेरळीकर , लक्ष्मण केंद्रे हाडोळीकर , बालाजी पाटील हिप्परगेकर , यांच्या पॅनला बहुमताने विजय झाला असुन सदरील ग्रामपंचायतीवर मन्याड सुर्योदय फाॅन्डेशनचा झेंडा फडकला असुन यासाठी सहकार्य केलेल्या मतदारांचे लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांनी अभिनंदन करत लोहा येथील छञपती शिवाजी महाराज चौकातील जनसंपर्क कार्यालयात निवडून आलेल्या पॅनल प्रमुखचे जल्लोषात स्वागत केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी मन्याड सुर्योदय फाॅन्डेशनचे बालाजी भैय्या परदेशी , राम पा मुरंबीकर , खंडु पा पवार , गजानन पा मोरे , तुळसीराम पा खांबेगावकर , पांडुरंग लोंढे , गजानन चव्हाण , यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.