
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील ग्रामपंचायत निकाल लागल्यावर सर्व पक्षाचे पदाधिकारी आप आपल्या परीने निवडून आलेल्या ग्रामपंचायतवर दावे करीत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे या विषयावर बाळासाहेबाची शिवसेना च्या वतीने नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्याचा सत्कार तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना उदय बोराडे म्हणाले की स्व.बाळासाहेब ठाकरे,स्व.धर्मवीर आनंद दिघे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने दाखवलेल्या जनतेच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. यावेळी सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार उदयसिंह बोराडे यांच्या हस्ते शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आला.
तालुक्यातील ३५ ग्रामपंचायती ३१ ग्रामपंचायत निकाल लोकशाही मार्गाने लागला तर चार ग्रामपंचायत बिनविरोध आल्या यामध्ये अंभोरा शेळके, उस्वद, उमरखेडा एरंडेश्वर,कोकरसा, कटाळा खु,कानफोडी, लावणी, जांभरुण, तुपा, ठेंगे वडगाव, टाकळखोपा, दहा, पाडळी दुधा, नायगाव, वाघाळा,हेलसवाडी, वाडेगाव पांढुर्णा, पोखरी केंधळे, हेलस, बरबडा, तळतोंडी, मुरूमखेडा, देवठाणा, मंठा, गेवराई, पाकणी, वडगाव सरहद, रामतीर्थ, कठाळा बु, कर्नावळ, गुळखंड, तळेगाव, माहोरा आणि तळणी या ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या सरपंच, सदस्याचे अभिनंदन स्वागत यापैकी तळणी, गेवराई, हेलस, बरबडा, केंधळी पोखरी, अंभोरा शेळके, वाडेगाव, पांढुर्णा, कर्नावळ विजय सदस्याचे स्वागत उदयसिंह बोराडे यांनी केले.
जनतेने दाखवलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे, स्धव.र्मवीर आनंद दिघे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लवकरच लागणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला सर्वच आपापल्या बाजू मांडण्यात जोर धरत आहेत पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेल की, कोणता सरपंच आणि कोणता गाव कुणाच्या बाजूने त्यामुळे उगीच मंठा तालुक्याचे श्रेय घेण्यापेक्षा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ठरवेल ती कोण कोणाच्या बाजूने.
उदयसिंह बोराडे. (बाळासाहेबाची शिवसेना तालुकाप्रमुख मंठा)