
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- शहरातील सकल जैन समाज ट्रस्टच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते सकल सन्मान करण्यात आला.यामध्ये भूम तालुका अध्यक्ष पदी सुनीलकुमार डुंगरवाल,उपाध्यक्ष पदी शांतीनाथ अंबुरे,कोषाध्यक्ष पदी शितलकुमार शहा,सचिव पदी प्रदीपकुमार आहेरकर,सहसचिव पदी अभयकुमार गांधी यांची तर सदस्यपदी विवेक पोखरना,स्वप्नील शहा,महावीर बोपलकर,बाहुबली एखंडे,सुनीलकुमार दोशी,विजयकुमार सुरपुरिया यांची निवड करण्यात आली असून यावेळी वरील सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी तुकाराम माळी,वस्ताद मामू जमादार,बबलू बागवान,संजय पवार, शाम वारे,राम बागडे,विष्णू शिंदे,शब्बीर सय्यद,पत्रकार अब्बास सय्यद यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.