
दैनिक चालू वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश नामदेव माने
– रोटरी क्लब ऑफ जालना सेंट्रलतर्फे रोटरी एक्सपोमध्ये आज गुरुवार दि. 22 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऐरो मॉडेलिंग शो चा जिल्ह्यातील 120 शाळांमधील 20 हजार विद्यार्थी, शिक्षक आणि आरपीटीएसच्या 20 हजार विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. 15 प्रकारच्या लढाऊ विमानांच्या रोमांचक प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थी भारावून गेले आणि त्यांच्यातील बालपण या निमित्ताने जागृत झाले.
विद्यार्थ्यांच्या कल्पनांना आकार देणे, त्यांची विज्ञान आणि तंत्रज्ञानाची रुची वाढविणे, त्यांच्या वैज्ञानिक विचाराला नवे पंख देण्यासाठी हिरो मॉडलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी सातारा येथून आलेले ऐरो मॉडलर सदानंद काळे यांनी 15 लढाऊ विमानांचे प्रात्यक्षिक सादर केले. लढाऊ विमानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल असते. लढाऊ विमानांचे कार्य कसे चालते याची माहिती श्री. काळे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
या शो नंतर विद्यार्थ्यांनी रोटरी कबाब जालना व रोटरी मिडटाउनद्वारा प्रायोजित रोटरी एक्स्पो 2022 ला भेट दिली. त्यात सॅटेलाईट पीएसएलव्ही , थ्री डी प्रिंटिंग टेकनॉलॉजी, तारांगण , रोबोट टेकनॉलॉजीचे प्रयोग पहिले. या इव्हेंटचे प्रायोजक राजुरी स्टीलचे संचालक कौस्तुभ लोहिया, उद्योजक घनश्याम गोयल, सुनील रायठठ्ठा, रोटरी क्लब ऑफ जालनाचे अध्यक्ष किशोर देशपांडे , रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष धवल मिश्रीकोटकर, आशुतोष सोनी, प्रकल्प प्रमुख परेश रायठठ्ठा हे होते. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत सुरेंद्र मुनोत यांनी केले. सूत्रसंचालन स्वप्नील बडजाते यांनी केले तर आभार डॉ. आशुतोष सोनी यांनी मानले.
याप्रसंगी भारत गादिया, राहुल तोतला, निलेश सोनी, सागर गंगवाल, भूषण मणियार, भास्कर पडूळ, प्रेम माखानी, अनिल छाबडा, सचिन लोहिया, उमेश बजाज, रंजन सिंग, सज्जन सकलेचा, डॉ. राजीव जेथलिया, 100 शिक्षक सोशल क्लबचे श्री. मगर आदींची उपस्थिती होती.