
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहर व तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली असुन जादा ट्रिप मारण्याच्या धांदात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बस व काळीपिवळी टॅक्सीवाले भरधाव वेगात गाड्या चालवित आहेत त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे .
यात दि.२३ डिसेंबर रोजी लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोनी सेंटर जवळ नांदेड दक्षीणचे आ.मोहन अण्णा हंबर्डे यांची इंनिवा गाडी क्रमांक एमएच २६ सीडी ०९०९ ही थांबलेली असताना नांदेडहून कंधारकडे अवैध प्रवासी प्रवासी करणाऱ्या खाजगी बस क्रमांक एमएच १४ बीए ९५७४ या खाजगी बसच्या चालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणे गाडी चालवून जोरदार धडक दिली असल्याने गाडीचे इंडीकेटर फुटुन मागचा भाग दबला गेला सुदैवाने यात कोणतीही हाणी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच लोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खाजगी बसच्या चालकाला अटक करुन गाडी पोलिस स्टेशनमध्ये लावली आहे.
लोहा शहर व तालुक्यात लोहा ,, सोनखेड , माळाकोळी अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी होत आहे खाजगी बसवाले व काळीपिवळी टॅक्सीवाले मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जादा प्रवासी वाहनात कोंबवून भरधाव वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. यात लोहा व सोनखेड हदीतून कंधारचे खाजगी बसवाले भरधाव वेगाने गाड्या चालवीत ” आडला नारायण — — या म्हणी प्रमाणे जादा पैसे ही घेत आहेत भरधाव वेगाने निष्काळजीपणे गाड्याही चालवित आहेत यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे तसेच छोट्या वाहनांना, मोटारसायकलवाल्याना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे .याकडे पोलिस प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही.
इंनिवा गाडीवर आमदार म्हणून विधानसभा सदस्यांचे स्टीकर चिटकिविलेले असुन कंधार येथील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंधार खाजगी बस चालकांने लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोनी साडी सेंटर समोर आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या गाडीला मागुन जोरदार धडक दिली व गाडीचे मागील इंडीकेटर फोडले यावेळी या खाजगी बस मध्ये ही मर्यादापेक्षा कित्येक पटीने प्रवाशी भरलेले होते.
आ. मोहन अण्णा हंबर्डे यांचे पुतणे नरसिंग धारोजीराव हंबर्डे हे लोहा येथील सोनी साडी सेंटर येथून कपडे खरेदी करून लातूरकडे नातेवाईकांकडे जात असताना सदरील घटना घडली.
लोहा पोलिसांनी सदरील प्रकरणी खाजगी बस चालकास ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली सदरील व्रत लिहि पर्यंत लोहा पोलीसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.